Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत Ashok Chavan यांचा भाजपमध्ये प्रवेश

ज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला.

काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड ही घडली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला आहे. आणि आता लवकरच ते भाजप मध्ये सहभागी होणार आहे. तर नुकतंच काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेस मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला.

आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी नुकताच काही वेळापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात आल्यानंतर आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी त्यांचे स्वागत केले. चव्हाण यांनी भाजप मुख्यालयात पाऊल ठेवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्याच्या राजकारणात होल्ड असणारा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं. मराठवाड्यातही अशोक चव्हाण यांच्या नावाला वलय आहे. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: नांदेडमध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. हिंगोली, लातूर आणि अर्थातच नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे. तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्त्व, अनेक वर्षे विधानसभा आणि लोकसभा गाजवणारे नेते, विविध मंत्रीपद भुषविलेल्या तसेच दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss