Friday, May 10, 2024

Latest Posts

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

‘टाईम महाराष्ट्र’ आणि एमटीडीसीने आयोजित केलेल्या या धाडसी क्रीडा प्रकाराचा आनंद घेताना तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षकांची आणि तंत्रज्ञांची साथ मिळणार आहे.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला साठावा वाढदिवस साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि तो ही ६० वा, मग काहीतरी स्पेशल हवंच ना? म्हणूनच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या षष्ट्यब्दीचे औचित्य साधून ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी एका साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही थरारक स्पर्धा महाराष्ट्रातील ‘पॅराग्लायडिंगची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या पाचगणी या ठिकाणी होणार आहे. हा साहसी क्रीडा प्रकाराचा मेळा १२ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खेळाडूंना अनुभवता येणार आहे.

पॅराग्लायडिंगबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा :- पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग  

पॅराग्लायडिंग (Paragliding) हा साहसी क्रीडा प्रकार असून महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात पॅराग्लायडिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पॅराग्लायडिंग करताना सभोवतालचा परिसर, डोंगर-दऱ्या आणि निसर्गाचे विलोभनीय दृश्य आपल्याला आकाशाच्या कवेत जाऊन अनुभवता येते. एरव्ही मनमोहक वाटणारी ‘हवा’ त्यावेळी थराराचा वेगळाच अनुभव देणारी असते. पॅराग्लायडिंग करणं म्हणजे स्वर्गीय सुख अनुभवण्यासारखं असल्याचं म्हटलं जातं. परंतु, हा साहसी थरार करण्यासाठी योग्य काळजीसुद्धा घ्यावी लागते. कोणत्याही प्रकारची दशा होऊ नये म्हणून, आवश्यक असणारी वाऱ्याची दिशा लक्षात घ्यावी लागते. पण याबद्दलची काळजी तुम्ही करण्याची आवश्यकता नाही कारण; ‘टाईम महाराष्ट्र’ आणि एमटीडीसीने आयोजित केलेल्या या धाडसी क्रीडा प्रकाराचा आनंद घेताना तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षकांची आणि तंत्रज्ञांची साथ मिळणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला एका अटीचे पालन करावे लागणार आहे. ते म्हणजे, पॅराग्लायडिंग (Paragliding) करण्याचा दुर्मिळ अनुभव आयुष्यभराच्या आठवणींमध्ये साठवून घेण्यासाठी तुम्ही वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असून तुमची शारीरिक स्थिती बळकट तसेच वजन आटोक्यात असणे गरजेचे आहे.

भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. ही स्पर्धा प्री वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणार आहे. त्यासाठी भारतासह युके, जर्मनी, कझाकस्तान, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, नेपाळ, तुर्की अशा देशासह १५ देशांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेमध्ये देशाच्या पॅराग्लायडिंग क्षेत्रात पहिल्यांदाच विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यात भारताचे सुनीत राव, विजय सोनी, अमेरिकेचे सुबीर असे जागतिक पातळीवर नावाजलेले पायलट्स सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेत महिला पॅराग्लायडर्सदेखील समावेश असणार आहे. तर मग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या षष्ट्यब्दीच्या पार्श्वभूमीवर रंगणारा पॅराग्लायडिंग (Paragliding) चा भव्य मेळा अनुभवायला सज्ज व्हा आणि अधिक माहितीसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) या न्यूज पोर्टलला Follow and Subscribe करा.

हे ही वाचा:

राजकारणात एन्ट्री करण्याबाबत कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss