Saturday, July 27, 2024

Latest Posts

असहकार पुकारायच्या आधी म्हटलं आयोगाला एकदा समजावून सांगू – Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या कामात शिक्षकांना घेऊ नये, यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन पाठवले आहे. याची माहिती त्यांच्या त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

कोण कारवाई करतं ते मी पाहतो

शिक्षकांवर विद्यादानाची महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांच्यावर निवडणुकांच्या कामाचा अतिरिक्त भार अवेळी टाकणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी भूमिका घेतली आणि अतिशय जबाबदारीने शिक्षकांना आवाहन केलं की, “कुणीही आयोगाला सहकार्य करू नका, कोण कारवाई करतं ते मी पाहतो!” पण हा असहकार पुकारायच्या आधी म्हटलं आयोगाला एकदा समजावून सांगू… त्या अनुषंगाने माझे सहकारी नेते ‘मुख्य निवडणूक आयुक्तां’ना पक्षाच्या अधिकृत निवेदनासह भेटले. त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला, पर्यायही सुचविले. पालकांमध्ये असणारा रोष आयोगपर्यंत पोहचवला. ह्या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिक्षकांसाठी कार्य सक्तीचे आदेश मागे घेतले आहेत. तसंच आयोगाने निवडणूक प्रक्रियेत मनुष्यबळ उभं करण्यासाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे आणि तसं त्यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्धही केलं आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे माझ्या पक्षातर्फे, समस्त शिक्षकवृंद तसंच चिंतातुर पालक आणि विद्यार्थ्यांतर्फे मन:पूर्वक आभार मानतो. असे राज ठाकरे ट्वीटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात मिळण्यासाठी शासन कटिबद्ध – CM Eknath Shinde

तुतारी चिन्हाचं अनावरण होताच सत्ताधारी पक्षाने केली जोरदार टीका, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss