Saturday, July 27, 2024

Latest Posts

तुतारी चिन्हाचं अनावरण होताच सत्ताधारी पक्षाने केली जोरदार टीका, म्हणाले…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्यांच्या या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर झाले आहे. हे अनावरण होत असताना सत्ताधारी पक्षाने मात्र जोरदार टीका ही केली आहे.

चिन्हाचे अनावरण होताच भाजपकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे. तुम्ही तुताऱ्या वाजवा… नाहीतर मशाली पेटवा. पण आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडणूक आणू, असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गट आणि ठाकरे गटावर टीका केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढत आहे. मोदींची जात, पात, धर्म, गट यांच्या पुढे गेलेले आहेत. मोदीजींनी लाभार्थी नावाचा गट निर्माण केला आहे. आणि तो असा म्हणतो की, विरोधी पक्षांचे राजकारण आता बास. आम्हाला फक्त मोदीजी पाहिजेत. त्याचा प्रत्यय आता दिसत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका, तीन राज्यातील निवडणुकीत भाजपला यश मिळाले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दिल्ली शेतकरी आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आहेत. नरेंद्र मोदी हे आपल्या मंत्र्यांच्या मदतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून नक्कीच मार्ग निघेल. कुणी धमकी देण्याचं कारण नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारत स्ट्रॉंग झाला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरायचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला ३ चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. शरद पवार या चिन्हाचे अनावरण आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगडवर होत आहे. त्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. स्वतः शरद पवारसुद्धा कार्यक्रमस्थळी पोहचले आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल ४० वर्षानंतर रायगडवार गेले आहेत. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं.

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss