Tuesday, April 16, 2024

Latest Posts

धारावीच्या पुनर्वसित व्यवसायाला GST परतावा मिळणार

मागील अनेक वर्षांपासून धारावीचा (Dharavi) पुनर्विकास अजूनही रखडलेला आहे.

मागील अनेक वर्षांपासून धारावीचा (Dharavi) पुनर्विकास अजूनही रखडलेला आहे. त्यातच आता धारावीकरांना आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये धारावीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. धारावीमध्ये मागील अनेक वर्षांपासून छोटे मोठे व्यावसायिक काम करत आहेत. या स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा यांसारखे फायदे होणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) आणि अदानी समूह (Adani Group) यांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) दिली आहे. या प्रकल्पाच्या निविदा अटीनुसार ही सवलत मिळणार आहे.

धारावीच्या विकासानंतर तिथे असलेल्या स्थानिक व्यवसायांमध्ये अनौपचारिक स्वरूपात बदल होणार आहेत. भारताच्या विकासाची संधी बनण्याचा भाग मिळणार आहे. यामुळे धारावीमध्ये चालू असलेल्या व्यवसायाला मजबूत पायाभरणी करता येणार आहे. तसेच या नफ्यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. धारावीतील व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होऊन अनेक संधी उपलब्ध होती, असे डीआरपीपीएलने सांगितले आहे. धारावीमध्ये अनेक कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन घेणारे हजारोच्या संख्येने व्यावसायिक आहेत. तिथे जगभरातील अनेक मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पुरवठादार आहेत. त्यांची दररोज लाखो डॉलर्सची उलाढाल आहे. या व्यवसायांना चालना देण्यासाठी जागतिक पातळीवर विस्तार केला जाणार आहे. धारावीतील लोकांची जीवनशैली सुधारण्यासाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देणे, भविष्यात उपयोगी पडेल असं शिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली या सर्व गोष्टी धारावीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

धारावीचा चांगल्या ठिकाणी विकास करणे एवढंच नसून तिथे असलेल्या विविधतेतील एकात्मता राखून रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली विकसित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पानंतर मोठा बदल घडून येणार आहे. त्यामुळे जगभरातील देशांना एक आगळेवेगळे उदाहरण प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे, असे डीआरपीपीएल कडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

गुप्त बैठका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाला त्यांनी जे काही गुमराह केलं; छगन भुजबळांची टीका

सरकारला आशा सेविकांची कदर नाही, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss