Wednesday, February 28, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल!

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल झाले आहेत. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे.

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे मोर्चास्थळी दाखल झाले आहेत. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे. परंतु, या कंत्राट भरतीत अदानींचा फायदा जास्त असल्याचं म्हणत शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज याविरोधात मोर्चा काढत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभा अधिवेशन सुरु आहे. मुंबईतील धारावी बचाव आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले असून या मोर्चामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्या आंदोलनात संजय राऊत, अरविंद सावंत सहभागी झाले आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा आज अदानी उद्योग समूहाविरोधात जोरदार मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धारावीत प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईतही होर्डिंग्ज लागले आहेत. संपूर्ण मुंबईतून लोक या मोर्चाला येणार आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अदानी बिल्डिंगकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अदानी ग्रुपच्या इमारती, कार्यालय समोरील सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यावरही प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस व्हॅनही लावण्यात आल्या आहेत.

३०० पोलिसांचा बंदोबस्त
धारावी ते बीकेसीपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४५ ते ५ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी ३०० च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत हा पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्तही या मोर्चावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss