Saturday, July 27, 2024

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

मनसेची आज आढावा बैठक होती.

मनसेची आज आढावा बैठक होती. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी निशाणा साधला. धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानी ग्रुपकडे देण्यासाठी ठाकरे गटाने विरोध केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावर आज राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यांना आता जाग का आली? सेटलमेंटसाठी मोर्चा काढला काय?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

एक मोठा प्रकल्प मुंबईत येतो आहे. हा प्रकल्प अदानींना का दिला? अदानींकडे असं काय आहे? की विमानतळपण तेच हाताळू शकतात.कोळसा प्रकल्पही तेच हाताळू शकतात असं यांच्याकडे काय आहे? टाटांपासून इतरही लोक उद्योगात आहेत. त्यांच्याकडून डिझाईन मागवू शकत होते. टेंडर मागवू शकत होते. पण ते झालं नाही. अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशीही बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडचं डिझाईन दाखवा. महाविकास आघाडीच्या लोकांना आज का जाग आली? हे सगळं जाहीर होऊन आठ- दहा महिने झाले असतील. मग यांनी आज का मोर्चा काढला?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मेरी मर्जी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो प्रकल्प अदानी ग्रुपला देण्याला ठाकरे गटाने आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून मोर्चाही काढण्यात आला. यावर रज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेची लोकसभेची तयारी सुरु आहे. त्याची आज राज ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. मुंबईतील MIG क्लबमध्ये आज मनसेची लोकसभा आढावा बैठक पार पडली. राज ठाकरे २२ लोकसभा मतदार संघांचा आढावा घेतला. मुंबई, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, विदर्भ मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला आहे.

हे ही वाचा:

देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss