Saturday, July 27, 2024

Latest Posts

MUMBAI: DOUBLE DECKER BUS मध्ये आता कॅफिटेरियाची सोय

बेस्टकडून उपलब्ध असलेल्या २३ डबल डेकर बस भंगारात काढण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत आणि नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

आता मुंबईच्या नॉन एसी डबल-डेकर (NON AC DOUBLE DECKER BUS) बसमध्ये प्रवाशांना काही सोयी उपलब्ध करण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईमधील (SOUTH MUMBAI) तीन जंक्शनच्या ठिकाणी या बस उभ्या केल्या जाणार आहेत. त्यामध्ये आर्ट गॅलरी (ART GALLERY), कॅफिटेरिया आणि लायब्ररी (LIBRARY) अशा गोष्टी असणार आहेत. नॉन एसी बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बी वार्ड काढून निविदा काढण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारीपासून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

८ डिसेंबर १९३७  रोजी बेस्ट बसची पहिली डबल-डेकर चालवण्यात आली होती. त्यानंतर बसची काल मर्यादा पंधरा वर्षे असल्यामुळे या बस बंद करण्यात आल्या होत्या. पण आता बंद केलेल्या बसेस नव्या स्वरूपात प्रवाशांना पाहायला मिळणार आहेत. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही यात आवड दाखवून पुढील कामकाज मार्गी लावण्याचे सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या बी वॉर्ड करून तीन नॉन एसी डबल डेकर बसमध्ये आर्ट गॅलरी, लायब्ररी तसेच कॅफिटेरियाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी आर्किटेक्चरकडून बसचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. एका डबल-डेकर बस मध्ये कॅफिटेरिया तर दुसऱ्या बसमध्ये लायब्ररी आणि तसेच तिसऱ्या बसमध्ये आर्ट गॅलरी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

डबल डेकरमधील या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी दक्षिण मुंबई मधील तीन जंक्शनची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाय. एम. रोड, शालिमार जंक्शन तसेच क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणांचा समावेश आहे. कॅफिटेरियामध्ये विविध खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांना घेता येणार आहे. यातूनच विविध संस्कृतींचे दर्शन सुद्धा घडवले जाणार आहे. याशिवाय लायब्ररीमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेसह विविध पुस्तके वाचकांना वाचायला मिळू शकतात.
बेस्टकडून उपलब्ध असलेल्या २३ डबल डेकर बस भंगारात काढण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत आणि नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. या कामासाठी पालिकेच्या बी वॉर्ड कडून २३ डिसेंबरला निविदा काढण्यात आली आहे तर ३१  डिसेंबर ही निविदा भरण्याची अंतिम मुदत असणार आहे.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

भारतातील ‘या’ ठिकाणी ख्रिसमस सण मोठ्या धामधुमीत होतो साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss