Sunday, May 19, 2024

Latest Posts

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. सध्या मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही धरणांमध्ये सध्या केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यंदाच्या वर्षी पावसाचे आगमन लांबल्यास मुंबईत पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जून, जुलैच्या पावसावर (Rain Updates) पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

मागील वर्षी याच महिन्यामध्ये या ७ धरणातील पाणीसाठा जवळपास ४० टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे उन्हाळ्याचे २ महिने आणि त्यानंतर पुढील जून जुलै असे २ महिने असे एकूण ४ महिने या धरणातील पाणीसाठ्यावर मुंबईकरांना काढावे लागणार आहेत. सध्या राज्यातील वातावरणात सतत अनेक बदल (Climate Change) होत आहेत. कधी उन्हाचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ ही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. ७ ही धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर त्यापैकी सद्यस्थितीत ५ लाख ४५ हजार १९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा या ७ ही तलावांमध्ये आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात या सातही तलावातून केला जातो. यावर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये किती पाऊस पडतो, त्यावर मुंबईच्या पाणी कपाती संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

हे ही वाचा : 

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ वाढतोय!, रुग्णामध्ये होतेय सातत्याने वाढ

छ. संभाजीनगर पाठोपाठ आता कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान झाली दगडफेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss