Sunday, May 19, 2024

Latest Posts

छ. संभाजीनगर पाठोपाठ आता कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान झाली दगडफेक

आज सर्वत्र देशभरात श्रीराम नवमीच्या (Ran Navami) हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत.

आज सर्वत्र देशभरात श्रीराम नवमीच्या (Ran Navami) हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक मानले जातात. त्यांनी शांततेचा संदेश दिला. त्यांनी न्यायाला महत्त्व दिलं. आपल्या प्रजेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. एक मुलगा म्हणून आपण कसं असावं, एक धनुर्धारी योद्धा म्हणून कसं असावं, एक राजा म्हणून कसं असावं, एक माणूस म्हणून कसं असावं हे श्रीरामांचं चरित्र वाचल्यावर समजतं. पण आज रामजयंतीच्या दिवशीच काही अनपेक्षित अशा घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटातील वाद विकोपाला गेल्याची अजून ताजीच आहे तर त्यात नवीन एका घटनेची भर पडली आहे. कोलकाता जवळील पश्चिम बंगालच्या हावडा येथे गुरुवारी संध्याकाळी रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार भडकल्यानंतर काही वाहने जाळण्यात आली, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

 रामनवमीच्या यात्रेदरम्यान कोलकाताच्या हावडामध्ये दगडफेक झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हावडामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हावडामधील शिवपुरी भागात ही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता दिसत आहे. तर दुसरीकडे गुजरातच्या फतेहपुरातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. फतेहपुरात रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शोभायात्रेत सहभागी असलेले काही भाविक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले.

पश्चिम बंगालमध्ये विशेषतः हावडा भागात रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचाराच्या बातम्या नवीन नाहीत. यापूर्वी २०२२ मध्ये बंगालच्या हावडा आणि बांकुरा येथे रामनवमी उत्सवादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या दोन घटनांमध्ये सहा पोलिस कर्मचार्‍यांसह २० लोक जखमी झाले होते.

महाराष्ट्रातील हिंसाचाराच्या बातम्या

रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान देशाच्या इतर अनेक भागांतही हिंसाचार झाल्याची नोंद आहे. आदल्या दिवशी, छत्रपती संभाजीनगर [पूर्वीचे औरंगाबाद] किराडपुरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सार्वजनिक वाहनांसह अनेक पोलिस व्हॅन जाळण्यात आल्या, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली. महाराष्ट्रातील जळगावमध्येही अशाच घटना घडल्या आहेत.

हे ही वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर विजेते गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांची भेट

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘Maidaan’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss