spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

मुंबईमध्ये २३८ वंदे भारत मेट्रो ट्रेन ‘रेक’ खरेदी करण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी

मुंबईमध्ये लवकरच २३८ वंदे मेट्रो ट्रेन मिळणार आहेत ज्या शहरामध्ये एसी लोकल धावतील त्या शहरामध्ये एसी लोकलला चालना देण्यासाठी या वेंडी मेट्रो ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

मुंबईमध्ये लवकरच २३८ वंदे मेट्रो ट्रेन मिळणार आहेत ज्या शहरामध्ये एसी लोकल धावतील त्या शहरामध्ये एसी लोकलला चालना देण्यासाठी या वेळी मेट्रो ट्रेन चालवण्यात येणार आहेत. २३८ ची खरेदी वंदे भारत मेट्रो मुंबईसाठी गाडयांना रेल्वे बोर्डाने शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे. वंदे मेट्रो हा एक आधुनिक रेक असेल तो सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील शहरांना कव्हर करण्यासाठी कमी अंतरासाठी तैनात केला जाणार आहे. हे रेक मुंबई शहरी वाहतूक प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) अंतर्गत खरेदी केली जाणार आहेत.

नवीन अपग्रेड केलेल्या गाड्या नेहमीप्रमाणे रेल्वे कारखान्यामध्ये बनवण्याऐवजी मेक इन इंडिया मार्गदर्शन तत्वांची खात्री करून तंत्रज्ञान भागीदार त्यांच्या स्वतःच्या कारखान्यांमध्ये विकसित करणार आहेत. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी महानगरांमधील उपनगरीय गाड्या सरकारकडून चालवल्या जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळच्या प्रवक्त्याने सांगितले की, केंद्र सरकारच्या उद्योग विकास आणि अंतर्गत व्यापार केंद्राच्या मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्वांची खात्री करून या गाड्या भागीदाराद्वारे तयार केल्या जाणार आहेत.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १५ मे रोजी मुंबईमधील रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये एसी रेक खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. या एसी लोकलच्या देखभालीसाठी भिवपुरी (कर्जत) आणि वाणगाव (डहाणू) येथे नवीन कारशेड उभारण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss