Tuesday, June 6, 2023

Latest Posts

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. आजचा हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु आजचा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी त्यांना आहे. सनरायजर्स हैदराबादचा संघ शेवटच्या सामन्यांमध्ये विजय मिळावा याच इराद्याने मैदानामध्ये उतरेल. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आतापर्यंत २१ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद संघ १२ तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघ ९ सामने जिंकले आहेत.

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल २०२३ च्या प्लेऑफच्या शर्यतीमधून आधीच बाहेर झाला आहे. गुजरात टायटन्सच्या विरुद्ध सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळे सनरायजर्स हैदराबादचे प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. या परिस्थितीमध्ये ऍडम मार्करामच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादचा संघ अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगरुळु संघाची संभाव्य प्लेइंग ११ –

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, मायकेल ब्रेसवेल, कर्ण शर्मा, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल

सनरायजर्स हैदराबाद संघाची संभाव्य प्लेइंग ११ –

अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स/हॅरी ब्रूक, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक जैन/फारूक

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss