Saturday, July 27, 2024

Latest Posts

राम मंदिर राजकारणाचा विषय नाही आस्था श्रद्धेचा विषय…, संजय राऊत

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच राज्याचे हिवाळी अधिवेशन हे पार पडले. तर दुसरीकडे आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात राजकाणार हे चालू आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच राज्याचे हिवाळी अधिवेशन हे पार पडले. तर दुसरीकडे आता राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात राजकाणार हे चालू आहे. अश्यातच आज सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप हे केले आहेत.

आज संजय राऊत हे म्हणाले आहेत की, देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काही देणं नाही. भाजपचे लोक कधीच पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही. यांचं म्हणणं आहे की, देश २०१४ साली जन्माला आला मी तर म्हणतो की भाजपच २०१४ साली जन्माला आला आहे. बाबरी एपिसोड त्या आधीचा आहे. भाजपवाले (BJP) सगळे ब्रिटिशांचे मुखाबीर होते, भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कुठे होते? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.

तसेच पुढे संजय राऊत म्हणाले, राममंदिर हा अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. हजारो कारसेवक शहीद झाले, तर अनेकांना शरयुत फेकून दिलं होतं. राम मंदिर राजकारणाचा विषय नाही आस्था श्रद्धेचा विषय आहे. रामापेक्षा मोठं कुणीच नाही. राम मंदिर कुणाच्या बापाचं नाही, कुणाच्या मालकीचं नाही. मणिपूरमधे काय झालं तुम्हाला माहिती नाही का? तुम्हीच अपशकुनी आहात. ईव्हीएम आहे तोपर्यंत तुम्ही आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे. शिवसेनेचे योगदान आम्हाला विचारता, तुम्ही त्यावेळी कोणत्या बिळात होतात हे आम्हाला माहिती आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी सांगितलं होतं की, बाबरी पाडणारे शिवसेनेचेच लोक होते. आम्ही लोणचं, चटणी काहीही असलो तरी पळपुटे नाही. तुम्हीच रणछोडदास आहात. तुम्ही युद्धात मैदानवर कुठे आहे ते सांगा आणि मग लोकांची पापड, लोणची विका. शिवसेनेचे तत्कालीन सर्व खासदार अयोध्येच्या भूमीवर होते आणि सगळे त्या केसमध्ये आरोपी आहेत. तुम्ही तर तेव्हा बिळात लपले होते, असे संजय राऊत म्हणाले.

भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राम मंदिराचं उद्धाटनावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. व्हीव्हीआयपी लोकांना या राम मंदिराच्या उद्घटनासाठी बोलावलं आहे. राज ठाकरे व्हीव्हीआयपी आहेत. तर उद्धव ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कोण महाजन? मी फक्त एकाच महाजनांना ओळखतो. ते म्हणजे प्रमोद महाजन. प्रमोद महाजन यांचं शिवसेना भाजप युतीसाठी शेवटपर्यंत योगदान होतं. तेच महाजन मला फक्त माहिती आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss