Saturday, July 27, 2024

Latest Posts

कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोर संजय राऊत त्यांच्या कुटुंबियांशी

राज्यामध्ये कोविड काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांशी असल्याचे सांगण्यात येत आहेत.

राज्यामध्ये कोविड काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांशी असल्याचे सांगण्यात येत आहेत. या घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे (Rajiv Salunkhe) यांच्या खात्यातून संजय राऊत यांचे निकटवर्तीय याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. नंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत (Sandip Raut) आणि कन्या विधीता राऊत (Vidhita Raut) यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पोलीस खात्यासमोर आले आहे. मुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.कोविड काळात खिचडीचं कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीचे राजीव सांळुखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी सुजीत पाटकर यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता. त्याचे पुरावे आता समोर आले आहेत. सुजीत पाटकरांच्या खात्यातून हाच निधी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊत याच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे समोर आले आहे.

खिचडी घोटाळ्यातील पैसे नेमके कोणत्या खात्यावर फिरवण्यात आले? 

सुजीत पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर ७.७५ लाख रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यावर १४. ७५ लाख जमा झाल्याचे पोलीस तपासात उघड

कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने देऊन, मोठा भ्रष्ट्राचार केल्याचे पोलिस तपासात उघड

खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवल्याचा पोलिसांच आरोप

खिचडी बनवण्याचे कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तिय बाळा कदम यांच्या मे वैष्णवी किचन (सह्याद्री रिफरेशमेन्ट) या नावाने देण्यात आले

मूळात या कंपनीचा पत्ता चुकीचा देण्यात आला असून या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलीस तपासात उघड झालंय.

इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति ३०० ग्रॅम खिचडीचे ३३ रुपये मंजूर केले असताना, प्रत्यक्षात मात्र १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करत ५ कोटी ९३ लाख ९७ हजार २३५ रुपये स्विकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी ३.२० कोटी देत, उर्वरित २ कोटी ३ लाखाच्या निधीचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खिचडी वाटपाची वर्क ऑर्डर मिळवून देण्यास मदत केल्याचे आणि खिचडी कन्सलटन्सी सर्विसेस पुरवल्या म्हणून मे एमएसपी असोसिएटचे सुजीत पाटकर यांना गैर लाभातून पैसे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

सुजीत पाटकर यांच्या खात्यातून गैरलाभातून मिळालेले ४५ लाख रुपये तसेच सुजीत पाटकर यांच्या सांगण्यानुसार विधिता राऊत यांच्या खात्यात १४. ७५ लाख, तर संदीप राऊत याच्या खात्यात ७.७५लाख रुपये वळते केल्याचेही पुरावे पोलिसांना सापडले असून या आर्थिक घोटाळ्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असताना खिचडी घोटाळा चांगलंच गाजला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. कोविड काळातील १०० कोटींचा घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही अश्या सर्व नागरिकांसाठी जेवणाची सोय करण्यात यावी असा निर्णय तात्कालीन सरकारने घेतला होता. भारत सरकारचे देखील याला समर्थन होते. या कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेने दिले होते. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आली, असे महानगरपालिकेचे मत आहे. या घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

सगळे करप्ट पार्टीत आहेत मग नवाब मालिकांवरच हल्ला का?, संजय राऊत

नवाब मलिक यांच्यासंदर्भात फडणवीस यांनी दिलेल्या पत्रासंदर्भात अजित पवारांनी सोडले मौन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss