Saturday, May 18, 2024

Latest Posts

“पिक्चर अभी बाकी है,मेरे दोस्त”; अमेय खोपकरांचा संजय राऊतांना इशारा

राजसाहेबांचं झंझावाती भाषण कसं झोंबलंय ते सकाळच्या रडत राऊतांच्या रडगाण्यावरुन जनतेला कळलंच असेल. विरोधकांना सळो की पळो करणारी राजसाहेबांची शैली या निवडणुकीतला हायलाईट ठरणार हे नक्की."असे ट्विट करत संजय राऊतांवर घणाघाती टीका केली

नारायण राणे(Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कोकणात जाहीर सभा घेतली. त्यांच्या सभेनंतर विरोधकांनी राज ठाकरेंसह नारायण राणेंवर टीका केली. आज सकाळी ठाकरे गटाचे संजय राऊत(Sanjay raut) यांनी ”राज ठाकरे मौनी खासदारांचं समर्थन करत आहेत. ही त्यांची मजबुरी आहे.राज ठाकरेंचा देव बदलु शकतो.”अशी टीका केली होती. त्यावर मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विट करत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

मनसे नेते अमेय खोपकर(Amey Khopkar) यांनी आपल्या ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरुन “राजसाहेब ठाकरे यांची कणकवलीमधली सभा दणदणीत झाली. राजसाहेबांचं झंझावाती भाषण कसं झोंबलंय ते सकाळच्या रडत राऊतांच्या रडगाण्यावरुन जनतेला कळलंच असेल. विरोधकांना सळो की पळो करणारी राजसाहेबांची शैली या निवडणुकीतला हायलाईट ठरणार हे नक्की.”असे ट्विट करत संजय राऊतांवर घणाघाती टीका केली.

पुढे ते म्हणाले की, “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”असं म्हणत संजय राऊतांना इशारा दिला आहे. तर आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  “राज ठाकरे यांची काल कोकणात सभा झाली, काल उद्धव ठाकरे देखील कोकणात होते. प्रकल्पांनाविरोध का होत आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पळवायचे. महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांचे मोदी, शाह यांनी गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विनाश करणारे प्रकल्प आमच्यापाठी मारायचे.आमच्या शेती जमिनीच नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावर कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची.सध्या हे जे नवीन मोदी आणि शहांचे भक्त झाले आहेत ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे.”अशा शब्दात आयोजित पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली होती.

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

आज एकमेकांवर टीका करणारे नंतर एकत्र हॉटेलमध्ये जेवतात, Prakash Ambedkar यांची विरोधकांवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss