Wednesday, February 28, 2024

Latest Posts

धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरे आक्रमक, काय आहे मागण्या घ्या जाणून सविस्तर माहिती…

आज दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी ठाकरे गटाचा मोठा मोर्चा होणार आहे. अदानी समूहाविरोधात हा मोर्चा घेण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

आज दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी ठाकरे गटाचा मोठा मोर्चा होणार आहे. अदानी समूहाविरोधात हा मोर्चा घेण्यात येणार आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी ठाकरे गटाने जय्यत तयारी केली आहे. आजच्या मोर्च्याचा निमित्ताने धारावी सज्ज झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धारावी पुनर्विकास प्रकल्पा विरोधात आजच्या या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. धारावी टी जंक्शन येथून दुपारी ३ वाजता हा मोर्चा निघणार असून बीकेसीच्या फटका मैदानात सभेत रूपांतर होणार आहे. धारावी टी जंक्शन येथे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. तसंच सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. धारावीत ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. तसेच झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे. धारावीतील प्रत्येक घरातून माणसं मोर्चाला नेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असून या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातून अदानी कंपनीला देण्यात आलेल्या विविध सवली रद्द कराव्यात आणि सर्व रहिवाशांना त्याच परिसरात जागा मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मागण्यांसंदर्भात एक पोस्ट शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

काय आहेत नेमक्या मागण्या? –

  • धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा.
  • निवासी झोपडपट्टी धारकांना ५०० चौरस फुटाचे घर मोफत द्या ‘टीडीआर’ साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी
  • पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मोफत द्या
  • नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा.
  • प्रकल्पाचे स्वरूप समजावण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या.
  • शाहूनगर लेबर कॅम्प मधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांची घरे द्या.
  • अदानी हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्याने म्हाडा, सिडको प्राधिकरणाकडून बीडीच्या धरतीवर पुनर्विकास करा

कसा असणार धारावी मोर्चाचा मार्ग ?

– धारावी टी जंक्शन पासून मोर्चाला सुरूवात होईल
– त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा बीकेसीकडे जाईल
– सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ 8 जवळून हा मोर्चा पुढे फटाका मैदान येथे थांबेल
– फटाका मैदान धारावी येथे सभा होईल
– या ठिकाणी नेते भाषण करतील

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss