Thursday, May 2, 2024

Latest Posts

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली, निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात घेतलेल्या निर्णयानुसार तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात घेतलेल्या निर्णयानुसार तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली केली जाणार आहे. इक्बालसिंह चहल यांची बदल थांबवण्यासाठी राज्य सरकारने मागणी केली होती,मात्र ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Commissioner Ashwini Bhide) आणि इतर काही अधिकाऱ्यांची बदली केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली रोखण्याची मागणी राज्य सरकारने केली मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी स्वीकारली नाही. तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. हे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली जाणार आहे. पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी नसल्याचे सांगत बदली आदेशातून वगळावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. या संदर्भात राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. पत्र पाठवल्यानंतर निवडणूक आयोगाने मंगळवारी सरकारची मागणी फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त , वरिष्ठ अधिकारी यांची बदली होणार आहे.

तीन वर्ष किंवा त्याहून जास्त वर्ष पदावर असलेल्या महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करणे गरजेचे आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली होणार आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, दीड लाख महिलांना सभेत संबोधित करणार

भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss