Saturday, July 27, 2024

Latest Posts

WhatsApp Chatbot ॲपमुळे राज्याच्या पर्यटनाला मिळणार गती- Girish Mahajan

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राज्य पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. व्हॉट्सॲप चॅटबॉट लाँच केल्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना होईल तसेच ‘आई’ महिला केंद्रित धोरणाची माहिती नव्याने सुरू केलेल्या ॲपमुळे, पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजिकांना होईल या दोन्ही उपक्रमांमुळे राज्याच्या पर्यटनाला चालना मिळेल असे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात पर्यटन क्षेत्रांची माहिती पर्यटकांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले जाणे ही काळाची गरज आहे. राज्यात येणा-या पर्यटकाला उत्तम मुलभूत सोयी सुविधा, पर्यटन स्थळांची अचूक माहिती देखील प्राप्त होईल. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, महिलांचे आर्थिक स्वावलंबन व्हावे यासाठी ‘आई’ हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण आणले आहे या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात येत आहेत याची अद्ययावत माहिती महिलांना आई पॉलिसी धोरण ॲपच्या माध्यमातून होण्यासाठी मदत होईल.

पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, राज्यातील ११ गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत नामांकन मिळाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगाच्या पर्यटनस्थळात आपल्या पर्यटन स्थळांना मिळालेले स्थान यामुळे निश्चितच पर्यटक वाढतील.पर्यटन विभाग पर्यटन वाढीसाठी अनेक धोरण आखत आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नव्याने आलेले ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण निश्चितच राज्यातील पर्यटन क्षेत्रातील महिलांच्या विकासाला हातभार लावेल असेही त्या म्हणाल्या. पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले, पर्यटन क्षेत्रात पाच लाख रोजगार उपलब्ध व्हावेत, अशी धोरण आखली जात आहेत. राज्यातील संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव आयोजित करून स्थानिक ठिकाणी रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी पर्यटन संचालनालय काम करीत आहे. ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण देखील प्रभावीपणे राबवत आहे. पर्यटन तज्ज्ञ स्वाती खांडेलवाला, डॉ.संतोष सुर्यंवशी, सगुना बाग ॲग्रो टुरिझमचे संचालक चंदन भडसावळे, पॅराग्लायडिंग व्यावसायिक विस्तापस खरस, सचिन पांचाळ, केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या मोनिका प्रकाश, ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ कामाक्षी माहेश्वरी यांनी पर्यटन विषयक विचार मांडले.

हे ही वाचा: 

लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात – CM Eknath Shinde

शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, Sanjay Raut यांच्याकडून पुन्हा एक फोटो ट्वीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss