Saturday, July 27, 2024

Latest Posts

शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, Sanjay Raut यांच्याकडून पुन्हा एक फोटो ट्वीट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांसोबतचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आहेत. आज पुन्हा एक फोटो त्यांनी आज शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा असे खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे खासदार संजय राऊत यांची पोस्ट?

शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे. अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत! पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची  माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! असे संजय राऊत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहेत. 

Image

७ फेब्रुवारीला कोणाचा फोटो केला होता ट्वीट? 

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या ट्विटर फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम दिसत आहे. मागच्या वर्षी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी अश्या ७ गंभीर गुन्हेची नोंद आहे. २०२१ मध्ये जितेंद्र जंगमवर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ ला त्याची सुटका करण्यात आली. त्या सुटकेनंतर जितेंद्र याने शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यावेळसाचा हा फोटो आहे. हाच फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.

हे ही वाचा: 

शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या केली जात आहे – जितेंद्र आव्हाड

जनता मूर्ख नाही,सगळं जाणते,तेजस्विनीने केलेलं हे ट्विट नेमकं कोणासाठी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss