Monday, May 20, 2024

Latest Posts

भाजीपाल्यावरील दर घटला, नवी मुंबई एपीएमसी मार्केतमधील भाजीची आवक वाढली

गेल्या काही दिवसांपासून तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेले टोमॅटो आता 20 ते 25 रुपयांनी विकले जात आहेत.

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेले टोमॅटो आता 20 ते 25 रुपयांनी विकले जात आहेत. तर आता इतर पालेभाज्यांचे देखील दरही उतरले आहेत. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजींचे आवक वाढली आहे. परिणामी या भाज्यांचे दर आता कमी होऊ लागलेत एपीएमसी मध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे त्यामुळे भाज्यांचे दर हे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी उतरले आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये राज्यभरातून पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सुद्धा भाज्यांची आर्यात केली जाते. आवक वाढली असताना अचानक मुंबईत गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने भाजीपाला उठाव धरला आहे. भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात येत नसल्याने एपीएमसी मध्ये शिल्लक असलेल्या भाज्यांना आता फटका बसला जात आहे.

हेही वाचा  : 

संतोष जुवेकरची झाली ‘या’ अभिनेत्यासोबत हाणामारी

कोथिंबीर, फ्लावर, गावठी वांगे टोमॅटो, गाजर, ढोबळी मिरची, कारले, पालक, कांद्याची पात आदी पालेभाज्या कमी भावात विकल्या जात आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने आवक वाढल्याने भाजीपाल्यांची किरकोळ भाव कमी केल्याची माहिती दिली आहे. राज्यभरात मुसळधार पावसामुळे शेत पिकांचे नुकसान होत आहे. आणि यामुळे येत्या काळात भाज्यांचे दर वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

मागील महिन्यात उन्हाचा तडाका जास्त असल्याने भाज्यांचे दर वाढले होते. ज्यामुळे राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आणि दरामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. विशेष ताप म्हणजे पालेभाज्यांवर याचा परिणाम झाला होता.  मुंबईतील किरकोळ बाजारपेठेत फरसबी घेवडा पालक वाटाणे यांचे दर 100 पार केले होते.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होण्याची ही आहेत कारणं…

Latest Posts

Don't Miss