नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, अमरावतीसाठी भाजपकडून प्लॅन B तयार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, अमरावतीसाठी भाजपकडून प्लॅन B तयार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अश्यातच खासदार नवनीत राणा (Navneet Rane) यांचे जात प्रमाणपत्राचा (Caste Certificate) निकाल येण्याआधी भाजपचा (BJP) प्लॅन B तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता अमरावतीमध्ये भाजपकडून नव्या उमेदवारांची चाचपणी सध्या सुरु आहे. आचार संहिता लागण्याआधी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल येणार आहे. त्यांचा हा १ एप्रिल रोजी येण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी निकाल आल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर १ एप्रिलला निकाल लागणार आहे. १ एप्रिल ला निकाल जाहीर झाल्यानंतर २ एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार आहे. नाव घोषित झाल्यानंतर ४ एप्रिलला नवनीत राणा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला जाणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. त्यांच्याकडे बनावट जात प्रमाणपत्र असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाकडून १०८ पानाचा जजमेंट देण्यात आला होता. त्यातील राणा यांचे सात ही जात प्रमाणपत्र खोटे ठरवण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा निकाल १ एप्रिल ला लागणार आहे.

जर नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल लागला तर भाजपाकडून प्लान बी देखील तयार आहे. नवनीत यांच्या ऐवजी अमरावती प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार केला जाणार आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्यातील आहेत. दिगवंत रा.सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील विचार केला जाणार आहे. नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. काही दिवसांआधी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

हे ही वाचा:

होळी साजरा करण्यासाठी माहीम समुद्र किनारी गेलेले ५ पाच तरुण बुडाले; पाचपैकी दोघांचा मृत्यू

औंध रुग्णालयात रक्ताची अदलाबदली; आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी परिचारिकांना चांगलेच खडसावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version