Saturday, April 27, 2024

Latest Posts

औंध रुग्णालयात रक्ताची अदलाबदली; आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी परिचारिकांना चांगलेच खडसावले

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सरकार रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सरकार रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. डॉक्टरांच्या हलगरीपणामुळे रुग्णांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहेत. असाच हलगर्जीपणा औंध जिल्हा रुग्णालयामध्ये (Aundh Hospital Aundha Pune) सुरु आहे. याचा आढावा आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी रुग्णालयात जाऊन घेतला त्यानंतर त्यांनी परिचारीकांना चांगलच खडसावले आहे. परिचारीकेकडून रुग्णांना ‘ए’ ऐवजी ‘बी’ आणि ‘बी’ ऐवजी ‘ए’ रक्त चढवले होते. रुग्णालयात रक्ताची अदलाबदल केली जात होती. त्यामुळे रुग्णांची प्रकृती खालावली.

रुग्णालयात परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची वेळ आली आहे. रक्तामध्ये अदलाबदल केल्यानंतर रुग्णांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना चिंचवडच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजल्यानंतर त्यांनी लगेच औंध जिल्हा रुग्णालयात जाऊन हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांना चांगलेच खडसावले आहे. तसेच कडक कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत. परिचारिकेने रुग्णांना ‘ए’ ऐवजी ‘बी’ आणि ‘बी’ ऐवजी ‘ए’ रक्त चढवले होते. त्यामुळे रुग्णांची अचानक प्रकृती खालावली. रक्त गटाची अदलाबदली केल्याचे समोर आले आहे.

दत्तू सोनाजी सोनवणे (वय ५८) आणि दगडू सोनवणे (वय ७३)असे रुग्णांचे नाव आहे. रुग्णांच्या कुटूंबियांनी सांगवी पोलिस ठाणे आणि एडीएच प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तसेच चुकीच्या रक्तगटासाठी परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. ही घटना २३ मार्च रोजी औंध जिल्हा रुग्णालयात दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. रक्तसंक्रमण झाल्यानंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती खालावली. त्यानंतर दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात तात्काळ हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दत्तू सोनाजी सोनवणे यांना श्वास घेण्यास त्रास होणे, पोट फुगणे, अंगाला सूज येणे अश्या समस्या जाणवू लागल्या. २४ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र पचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी सोनवणे यांना रक्त ट्रान्सफ्युजन करण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा:

होळी साजरा करण्यासाठी माहीम समुद्र किनारी गेलेले ५ पाच तरुण बुडाले; पाचपैकी दोघांचा मृत्यू

ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या…Praniti Shinde आणि Ram Satpute आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss