Sunday, April 28, 2024

Latest Posts

होळी साजरा करण्यासाठी माहीम समुद्र किनारी गेलेले ५ पाच तरुण बुडाले; पाचपैकी दोघांचा मृत्यू

देशभरात काल सगळीकडे होळीचा उत्साह होता.

देशभरात काल सगळीकडे होळीचा उत्साह होता. मात्र मुंबईतील माहीम समुद्रात पाच तरुण बुडाल्याची दुःखद घटना घडली. यामध्ये बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी माहीमच्या समुद्रात सापडला. काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास होळी साजरा करण्यासाठी ५ तरुण मुंबईच्या माहीम समुद्र किनाऱ्यावर गेले होते. मात्र संध्याकाळच्या सुमारास समुद्राला भरती आल्याने पाचही तरुण समुद्रत बुडाले. त्यानंतर लाईफ गार्डनी ४ तरुणांना समुद्रातून बाहेर काढत हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र रात्री उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. तर त्यातील १ बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी संध्याकाळपासून शोध मोहीम सुरु होती.मात्र रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. त्यानंतर पुन्हा सकाळी शोध मोहीम सुरु करण्यात आली. या सर्च ऑपरेश दरम्यान बेपत्ता तरुणाचा देखील मृतदेह सापडला आहे.

होळी खेळण्यासाठी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास माहीम समुद्र किनारी ५ तरुण होळी खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळेस समुद्रात भरती आली होती. भरतीचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात पाचही मुले बुडाली. त्यातील ४ मुलांना वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. मात्र एक तरुण बेपत्ता होता. त्यातील वाचवण्यात आलेल्या चार मुलांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, एका मुलाचा मृत्यू झाला.तसेच चौघांपैकी दोघांवर प्राथमिक उपचार देऊन घरी पाठवण्यात आले. तर इतर १ तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री समुद्राला भरती आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आले होते. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरु करून बेपत्ता तरुणाचा मृतदेह शोधण्यात आला. ही सर्व मुले २० ते २१ या वयोगटातील असून माहीममध्येच राहणारी होती. सर्व पाचही मुले कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत.

काल देशभरात सगळीकडे प्रचंड उत्साहात होळी साजरा करण्यात आली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जल्लोषात होळी खेळली जाते. त्यातच होळी सणाच्या संध्याकाळी माहीम समुद्र किनारी पाच तरुण होळी खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात मोठी भरती आली होती. मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने रंग खेळात असताना पाचही तरुण समुद्रात बुडाले.

हे ही वाचा:

सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रगती करत आहे पण आज…CM Eknath Shinde यांचं म्हणणं काय?

ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या…Praniti Shinde आणि Ram Satpute आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss