Sunday, May 19, 2024

Latest Posts

Mumbai-Goa महामार्गासंदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट, कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल

काल दि. ३० मार्च रोजी पनवेलमध्ये तीन प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळा हा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

काल दि. ३० मार्च रोजी पनवेलमध्ये तीन प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळा हा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. यावेळी बोलत असताना नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहे. ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे नितीन गडकरी यांनी केले.

या कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत की, ‘भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे’. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, कोकणासाठी (Konkan) महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२.३०० कि.मी. आणि मूल्य २५१.९६ कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण , राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि मूल्य १२६.७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८.६० कि.मी. आणि मूल्य ३५.९९ कोटी) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे याचबरोबर एकूण ६३.९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४.६८ कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील ६६ पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल’. ‘रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

हे ही वाचा : 

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ वाढतोय!, रुग्णामध्ये होतेय सातत्याने वाढ

छ. संभाजीनगर पाठोपाठ आता कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान झाली दगडफेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss