राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस तापत आहे. राज्य सरकारकडून आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर सगळीकडे मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता आरक्षणाचे पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावर शिक्षकांना प्रतिक्रिया देणे चांगलेच महागात पडले आहे. आरक्षणाबाबत दिलेल्या प्रतिक्रियांमुळे एकूण २७ शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश आल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे मांडल्या आहेत. अश्याच पोस्ट जालन्यातील शिक्षकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता २७ शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषद शाळेत काम करत असलेल्या २७ शिक्षकांना या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर लावून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी या सर्व शिक्षकांना नोटीस पाठवल्या आहेत. तसेच शिक्षकांना ७ फेब्रुवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. तीन शिक्षणाधिकारी आणि ओबीसी नेते दीपक बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीमध्ये नोटीस पाठवण्यात आलेल्याशिक्षकांवर सुनावणी केली जाणार आहे.
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील ईश्वर गाडेकर या शिक्षकाने मराठा आरक्षणाबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्या पोस्टवर इतर शिक्षकांनी आपली प्रतिक्रिया मांडली होती. या सोशल मीडिया पोस्टद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर २७ शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी विनोद आरसूळ, दिगंबर गाडेकर, सतीश अंभोरे, नागेश मगर, उध्दव पवार, बद्री यादव, गजानन वायाळ, मधुकर काकडे, रामेश्वर काळे, अशोक शिंदे, दिगंबर जाधव, रमेश मायंदे, ऋषीकेश मुके, विनायक भिसे, विजय गाढेकर, मनोहर साबळे, अप्पासाहेब मुळे, सतीश नागवे, भगवान देठे, दीपक चव्हाण, जगन्नाथ शिंदे, चक्रपाणी मुळे, सुभाष भडांगे, विठ्ठल घुले, लक्ष्मण नेव्हल, डी.बी.घुमरे या सर्व २७ शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कायद्याशी खेळण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्र्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? – Supriya Sule
मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती