Saturday, July 27, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नोटीसा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक वाद सुरु आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक वाद सुरु आहेत. यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस आल्या आहेत. २४ तारखेच्या अलटीमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज मुंबईला येण्याची पोलिसांना भीती आहे. त्यामुळे शेकडो मराठा कार्यकर्त्यांनावर पोलिसांची करडी नजर आहे. २४ तारखेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आहे. अशातच या नोटीसा देण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्हयातील कंधार पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मराठा नेते , कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये , किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये, अशा आशयाची नोटिसा पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना दिल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी येत्या २४ डिसेंबर रोजी मुंबईत मराठा समाज मोठया संख्येने जाण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. ग्रामीण भागातून मराठा बांधव ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जातील, अशी शक्यता असल्याने ट्रॅकटर चालकांना नोटीसा देण्यात आल्या. ट्रॅक्टर घेउन गेल्यास वाहतुकीस अडथळा, लोकांची गर्दी होईल. त्यांच्याकडून जाळपोळ , गाड्या फोडणे, असे अनुचित प्रकार घडू शकतात. तसं काही झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करुन ट्रॅकटर जप्त केल जाईल असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे.

मराठा आंदोलकांना दिलेल्या नोटिसांवरून मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सरकारच्या पुढे अधिकारी कसे जाऊ शकतात? अधिकारी जाणूनबुजून नोटीस कसं काय देऊ शकतात?, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कधी कोणत्या जातीविषयी बोलत नाही. पण त्याला आम्ही सोडणार नाहीत. ते आमच्या जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत, आम्ही शांत आहोत पण शांत राहणार नाही. मराठवाड्यातील काही अधिकारी जातीयवाद करत आहेत. त्यांना कामावरून कमी केलं पाहिजे. सरकार गोरगरीब लोकांवर दबाव आणत आहेत तुम्हाला अधिकारी सांभाळायचे आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

केरळमध्ये कोविडची ३०० नवीन रुग्ण, तर ६ लोकांचा मृत्यू

POLITICS: दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवू नका, ROHIT PAWAR यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss