Tuesday, April 16, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde यांच्या हस्ते होणार पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला साठावा वाढदिवस साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी एका साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही थरारक स्पर्धा महाराष्ट्रातील ‘पॅराग्लायडिंगची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या पाचगणी या ठिकाणी होत आहे. हा साहसी क्रीडा प्रकाराचा मेळा १२ फेब्रुवारी पासून सुरु झाला असून १८ फेब्रुवारी रोजी पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एका ऐतिहासिक, साहसी आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन टाईम महाराष्ट्र (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) एमएसआरडीसी, एमआयडीसी, सारस्वत बँक आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांनी केले आहे. अत्यंत साहसी पद्धतीने आपलं राजकारण करताना सर्वसामान्यांनाही आपलंस करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या षष्ट्यब्दी पूर्तीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ फेब्रुवारी पासून या स्पर्धेच्या सरावाला सुरुवात झाली. महाबळेश्वर येथील पाचगणी या ठिकाणी स्पर्धकांनी सराव करत आकाशात उंच भरारी घेतली. तसेच, पाचगणीला उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांनी स्पर्धकांना मॅपच्या साहाय्याने पॅराग्लायडिंगचा मार्ग समजावून सांगितला. सुमारे १५० पायलट्स सहभागी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशाच्या पॅराग्लायडिंग क्षेत्रात पहिल्यांदाच लाखो रुपयांची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत.

१७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ‘एम बँड’ आणि ‘प्रोजेक्ट देव डी बँड’ यांच्या संगीताची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता स्ट्रॉबेरी विथ सीएम (Strawberry With CM) अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर, पॅराग्लायडिंग स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिलीमोरिया हायस्कूल मैदान, पाचगणी या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चला तर मग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या षष्ट्यब्दीच्या पार्श्वभूमीवर रंगणारा पॅराग्लायडिंग (Paragliding) चा भव्य मेळा अनुभवायला सज्ज व्हा आणि अधिक माहितीसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) या न्यूज पोर्टलला Follow and Subscribe करा.

 हे ही वाचा:

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss