Thursday, May 9, 2024

Latest Posts

जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते; देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल झाली आहे. आज त्यांच्या यात्रेचा समारोप मुंबईमधील शिवाजी पार्कवर होणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये असतानाच ”काँग्रेस न होती तो क्या होता” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. मी काय करेन हे सगळ सविस्तर सांगितल होतं. मी पुन्हा येईल, तर मी आलोच. जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो. माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे. उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते. योग्य वेळी उत्तर दिलं तर जग तुमचं उत्तर ऐकत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक फक्त यासाठी केला की, जगाला कळावे की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की, आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ. पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी हा विश्वास आहे. अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे.मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, माझं हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उध्दवजी (Uddhav Thackeray) यांनी स्वार्थासाठी पाठीत कांजिर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे हीत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो.आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक फक्त यासाठी केला की, जगाला कळावे की, आपण गुलामीतून बाहेर आलो आहोत. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की, आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ. पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी हा विश्वास आहे. अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काँग्रेस (Congress) नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसते तर दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टचार झाला नसता. राज्यात ३० ते ४० वर्षापूर्वी एका घराण्यापुरते राजकारण असायचं. आधी काही बाहुबली होते. पण आता ते बदलले आहेत. देश कदाचित आता विकसित झालेला असता. सांस्कृतिक दृष्ट्या देश पुढे असला असता. ३७० सारख्या चुका झाल्याचं नसत्या,काँग्रेस (Congress) नसती तर भारताचे विभाजन झाले नसते, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सध्या महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ मानले जाते. आतापर्यंत पक्षांनी पॉवर मन, गुन्हेगारांना संधी दिली होती.यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. सगळी इंजिन्स आपापल्या दिशेला जात आहेत. विरोधक असेलच पाहिजेत. पण, आम्ही विरोधक असताना आणि आताच्या विरोधकांमध्ये फरक आहे. हे असे लोक आहेत जे ऑर्डर बिघडवू इच्छित आहेत. ही कसली व्यवस्था आहे की, जेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने निर्णय देईल तेव्हा योग्य आणि विरोधात दिला की, शिव्या देतात. विरोधकांमध्ये जी स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस असे लोक घेत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

अंकुश आणि दीपा चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार,पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

पुणे जिल्ह्यामधील ७१ मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss