Wednesday, May 8, 2024

Latest Posts

विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, पक्ष प्रवेश करताना पाडवींना अश्रू अनावर

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षातील नेत्यांनी आपला पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षातील नेत्यांनी आपला पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सगळीकडे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमश्या पाडवी यांना शिंदे गटामध्ये प्रवेश करताना (Aamshya Padavi ) अश्रू अनावर झाले. मी ज्या विभागात राहतो. तो जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे. त्या ठिकाणी कोणतीच काम होत नव्हती. विकास होत नव्हता म्हणून कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण सत्तेमध्ये जायला हवं म्हणून आज मी प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया आमश्या पाडवी यांनी पक्ष प्रवेशावेळी दिली.

आमश्या पाडवी (Aamshya Padavi ) म्हणाले, मी कोणावर नाराज नाही मात्र निधीची कमतरता होती. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भरपूर निधी देण्यात येईल. ज्या दिवशी मी निवडून आलो त्याच दिवशी तुमच्या पक्षाची वाट लागली म्हणून मी प्रचंड रडलो होतो, असे व्हायला नको होते. आज पण मी कोणावर टीका करत नाही मी नाराज नाही विकास होण्यासाठी मी प्रवेश करत आहे, असे म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमश्या पाडवी यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपले आमदार पाडवी (Aamshya Padavi ) यांचे मी स्वागत करतो. त्यांचा मुलगा, पत्नी आणि पदाधिकारी आले आहेत. ते सुद्धा शिवसेनेमध्ये सामील झाले आहेत.पाडवी हा आमचाच माणूस आहे. आम्ही जाता जाता त्याला मतदान केले होते. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडेच आहे. अनेक जण म्हणतात चुकीचे आहे. पण ज्या पक्षांकडे शिवसैनिक नाहीत ती शिवसेना कशी? खरी शिवसेना आपणच आहोत,असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ मध्ये कोणी चुकीचा निर्णय घेतला हे जनतेने दाखवून दिल आहे. नीलम गोऱ्हे यांच्यापासून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आले आहेत.पाडवी यांनी बरोबर सांगितलं आहे, ज्यांच्या सोबत लढलो त्याच काँग्रेससोबत आपण कसे काम करायचं. अनेक जण मला म्हणाले, आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत. पण एकच दरवाजा उघडा होता तो म्हणजे युतीचा, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

अंकुश आणि दीपा चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार,पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना

जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss