Saturday, July 27, 2024

Latest Posts

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या नव्या जेएन.1 (JN.1) या नवीन व्हेरियंटने देशभरात सगळीकडे पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लग्न झाली आहे. दोन दिवस आधी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. सध्या धनंजय मुंडे हे आपल्या राहत्या घरी पुण्यात क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचे आठ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच या दिवसांत ८ हजार रुग्णांनाचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात रुग्णांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जेएन.१ व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आढळून आली आहेत. हे सर्व पाहता WHO ने सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पण सध्या असलेल्या व्हेरियंटचा धोका कमी आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर लक्षण सौम्य आहेत. तसेच रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी आहे. ज्या रुग्णांना आधी कोणता तरी आजार आहे अश्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

हे ही वाचा:

THANE: भिवंडीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व फन अँड फूड फेस्टिवल साजरा

MAHARASHTRA: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss