देशाला PM Modi यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गरज – Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल (सोमवार, १५ एप्रिल) मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, "१४० कोटी जनतेचा नेता खमका असला पाहिजे. आमचे नेते नरेंद्र मोदी हे आहेत. आम्ही सांगतोय कि मोदी पंतप्रधान होणार, विरोधकांनी सांगावं की कोण पंतप्रधान होणार.

देशाला PM Modi यांच्यासारख्या खमक्या नेतृत्वाची गरज – Ajit Pawar

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप, टीका टिपण्या करत आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (सोमवार, १५ एप्रिल) मोठे वक्तव्य केले. “देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, ” असे ते यावेळी म्हणाले. बारामती (Baramati) येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, “१४० कोटी जनतेचा नेता खमका असला पाहिजे. आमचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आहेत. आम्ही सांगतोय कि मोदी पंतप्रधान होणार, विरोधकांनी सांगावं की कोण पंतप्रधान होणार. बारामतीचा आमदार विकासाच्या बाबतीत कमी पडला आहे का? केंद्राचा मोठा निधी मिळत असतो पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत राज्यात केंद्राचा निधी आलाच नाही. विकासासाठी निधी देण्याची धमक अजित पवार मध्ये आहे.”

पुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर (NCP Sharad Pawar) अप्रत्यक्षपणे टीका करत अजित पवार म्हणाले, “सध्या तुम्हाला अनेकजण भेटायला येतील. जे कधी भेटत नव्हते तेदेखील भेटायला येतील. हे सगळे फक्त ७ तारखेपार्यंतच तुम्हाला भेटायला येणार. परत तुम्हाला भेटायला अजित पवारच येणार, मीच तुमची काम करणार. बाकीचे राजकारण करत आहेत.” “भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. बारामतीच्या आताच्या खासदाराला तीनवेळा निवडून दिलेत, आता मी सांगेन त्या खासदाराला निवडून द्या. देशाचे भवितव्य कोणाच्या हातात चांगले राहू शकते. ज्या लोकांना वेळ असतानादेखील ते मंत्री झाले नाहीत. मंत्री असताना आपण काम करू शकलो असतो. यावेळी, स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती उमेदवार म्हणून दिला आहे. मी सांगतो तसे केलेत तर बारामतीचा विकास झपाट्याने करून दाखवतो.” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Sangali मध्ये MVA मध्ये बंडखोरी, Vishal Patil यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

माझ्याबद्दल काही लोकांनी अपप्रचार केला- JAYANT PATIL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version