Tuesday, April 30, 2024

Latest Posts

माझ्याबद्दल काही लोकांनी अपप्रचार केला- JAYANT PATIL

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद सांगली येथे आयोजित करण्यात आली होती. सांगलीत शिवसेना आणि काँग्रेस मध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणं योग्य नव्हते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  सांगलीची जागा कॉंग्रेस आणि शिवसेनेने मागितली होती. शरद पवारांपासून आम्ही सर्वांनी काँग्रेसला जागा मिळावी तोडगा निघावा यासाठी प्रयत्न केले. आता हळू हळू निवडणूक सुरू होईल. आमचा सगळीकडे प्रयत्न आहे की भाजप समोर एक खमका उमेदवार उभा राहावा. एकास एक लढत झाली तर विजयी होईल. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका सांगितल्यानंतर आम्ही बोलणं योग्य नाही. पेटवणारे पेटवत असतात काहींचा यामागे हेतू वेगळा असतो. पेटवणारे एकदा एकत्र आले आणि त्यांच्या मध्ये आलं की अवघड होतं. मी विशाल पाटील यांच्या संपर्कात असल्याचे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगलीचा तिढा सुटला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी हा बसून विषय संपवावा. ज्यावेळी हा वाद सुरू होता त्यावेळी शरद पवार आणि मी स्वतः वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.
अजून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला नाही, अजून त्यांच्यात खूप काही होऊ शकते. अर्ज मागे घेण्यापर्यंत वेळ आहे. माझ्याबद्दल बऱ्याचवेळा काही लोकांनी अपप्रचार केला. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र बसलो. जागा वाटपात अनेक मतमतांतरे झाली. मलाच काही गोष्टींसाठी जबाबदार धरणे योग्य नाही. मग त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा जबाबदार धरले पाहिजे माझा त्याच्याशी काय संबंध? असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

जुन्या वादाला काही लोक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करताना पुढला विचार करायचा असतो. राज्य स्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करून पुढे जायचे असते. या संबंधात जे लोक वावड्या उठवतात त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे की त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते काय करतात. राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील हे वरती एकत्रित बसून चहा घेत असतील आणि म्हणत असतील हे काय चालले आहे. आपण एकमेकांना सांभाळून राजकारण केले. समजूतदार राजकारणी होते दोघे. मागे ४० वर्षांपूर्वी काय झाले याच्याशी काही घेणे देणे नाही. इतिहासावर बोलून भविष्याकडे लक्ष जात नाही, असे यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

‘बिग हिट मीडिया’चं ‘Bride तुझी नवरी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Salman Khan च्या घरावर गोळीबार, CM Eknath Shinde यांनी केली फोनवरून चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss