Monday, April 29, 2024

Latest Posts

Sangali मध्ये MVA मध्ये बंडखोरी, Vishal Patil यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरी करत अपक्षपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) तिढा सुटल्याचे दिसत असतानाच आता मोठी बंडखोरी समोर आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून (sangali Loksabha Constituency) उमेदवारीसाठी इच्छूक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अखेर बंडखोरी करत अपक्षपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून (Congress) दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे, आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा तिढा होण्याची शक्यता निर्माण झाली असून सांगलीतीळ तिढा महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरला आहे.

महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा पक्षाच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे काँग्रेसच्या विशाल पाटील आणि विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी नाराजी व्यक्त केली होती. शेवटी अनेक चर्चा आणि नेत्यांच्या भेटीगाठीतून माहाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाच्या चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे, नाराज झालेले विशाल पाटील काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यामुळे, विशाल पाटील ‘वंचित’ मध्ये पक्षप्रवेश करणार का? या चर्चांना उधाण आले होते. प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल पाटील यांना अपक्षपणे निवडणूक लढल्यास वंचित कडून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.

तसेच, प्रतीक पाटील यांनी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांचीदेखील मुंबईत जाऊन भेट घेतलीहोती. त्यात, प्रकाश शेंडगे यांनी प्रतीक पाटील यांना सांगलीत ‘जत पॅटर्न’ राबवण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे, विशाल पाटील पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता विशाल पाटील यांनी पुन्हा अर्ज भरल्यामुळे राज्यात चर्चा सुरु झाल्या आहेत.

याबाबात बोलताना विशाल पाटील म्हणाले, “काँग्रेस पक्षाने आणि माविआने सांगलीत मोठी चूक केली. काँग्रेसशी निगडित ३८ हजार कार्यकर्त्यांशी विचारपूस केली. त्यातून निवडणुकीचा एबी फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. आत पुन्हा दोन उमेदवारी अर्ज दाखल करणार असून माळ काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी आशा आहे.”

हे ही वाचा:

माझ्याबद्दल काही लोकांनी अपप्रचार केला- JAYANT PATIL

कल्याणमध्ये ठाकरेंनी Match fixing केलीय, राऊतांना भ्रष्टाचार आताच का दिसला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss