Saturday, July 27, 2024

Latest Posts

Trending: आदित्य L1 ने घेतला सूर्याचा पहिला फोटो

भारताची यशस्वी मनाली जाणारी सौर मोहीम ‘आदित्य एल १’ (Aditya L 1) च्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप म्हणजेच ‘पेलोड सूट’ उपकरणाने फोटो घेतला आहे. या सुटने रंगीबेरंगी पहिला फुल डिस्क फोटो पृथ्वीकडे पाठवला आहे. हा फोटो काढण्यासाठी दुर्बिणीने ११ फिल्टरचा वापर केला. आदित्य एल १ चा सुर्याकडील नियोजित स्थळाकडे सुरु असताना ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली आहे. पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि भौतिकी केंद्राने सुरु केलेले हे उपकरण म्हणजे मराठी असलेल्या अभियंत्यांचा आविष्कार आहे. इस्त्रोकडून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.

इस्त्रोने शेअर केलेल्या फोटोसोबत म्हटले आहे की, सनस्पॉट, ब्लॅक स्पॉट, सूर्यचे शांत क्षेत्र यामधून दिसत आहे. सूर्याची रहस्य शोधण्यासाठी १५ लाख किलोमीटरच्या प्रवासाला आदित्य एल १ दोन सप्टेंबर रोजी निघाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशनमधून पोलर सॅटेलाइट व्हीकल आदित्य L1 मिशन लॉन्च करण्यात आले होते. आदित्य L१ सात जानेवारी २०२४ पर्यंत लॅगरेंज पॉइंटवर पोहचण्याची शक्यता आहे. इस्त्रोने  २० नोव्हेंबर २०२३ एसयूआयटी पेलोड सक्रीय केला होता. या टेलीस्कोपने पहिल्यांदा ६ डिसेंबर २०२३ रोजी पहिला फोटो घेतला होता.

आता पहिली पूर्ण डिस्क फोटो घेण्यात आला. यामुळे आता सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे. आदित्य एल १ कडून सूर्याची पहिली प्रतिमा झाल्यानंतर वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी एकच जल्लोष केला. आजपर्यंत सुर्याच्या प्रभामंडळातील किंवा पृष्ठभागावरील प्रतिमा मिळत होत्या. सूट उपकरणामुळे सूर्याच्या विविध स्तरातील फोटो प्राप्त होत आहेत. या उपकरणात २०० ते ४०० नॅनोमीटर तरंगलांबी श्रेणीमध्ये कार्यरत असलेली ११ विशेष फिल्टर लावले आहेत. सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमास्फियरच्या उच्च रिझोल्यूशन प्रतिमा मिळणार आहे. आता मिळालेल्या प्रतिमेत तीन वेगवेगळी फिल्टर वापरुन उपलब्ध झाली आहे.

Latest Posts

Don't Miss