Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यातील ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, निखिल वागळेंवर हल्ला

पुण्यामध्ये काल पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

पुण्यामध्ये काल पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर तिथे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटें (dhiraj ghate) यांच्यासह ४३ आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात निर्भय बनो (Nirbhay Bano) या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्र सेवा दलमध्ये निर्भय बनो हा कार्यक्रम ९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला जाताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह व्यक्त केला होता. त्यामुळे भापजचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला.

या घटनेप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेला पहिला गुन्हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर केला आहे. तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या २०० ते २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्र सेवा दलात निर्भया बनो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्थळावर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र आदेशाचे उल्लंघन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. यावेळी घटनास्थळावर मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याने या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून होत असलेल्या विरोध स्वीकारूनसुद्धा निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहचले.

निर्भय बनो या कार्यक्रमादरम्यान मोठा गदारोळ निर्मण झाला होता. या कार्यक्रमा दरम्यान निखिल वागळे यांच्यावर शाहीफेकआणि हल्ला करण्यात आला. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये कार्यक्रमा दरम्यान गोंधळ झाला. सर्व कार्यकर्ते आमनेसामने आले. निखिल वागळे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आक्षेपार्ह विधान केले.

हे ही वाचा: 

मुंबईच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, असे करा प्रवासाचे नियोजन गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य; फोटो शेअर करत संजय राऊतांनी केली सरकारवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss