Saturday, July 27, 2024

Latest Posts

गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य; फोटो शेअर करत संजय राऊतांनी केली सरकारवर टीका

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले गुंडांचे फोटो ट्विट करत आहेत.

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले गुंडांचे फोटो ट्विट करत आहेत. संजय राऊत यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या प्रश्नाला घेऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांच्यासोबत गंभीर गुन्हेंचा आरोप असलेला आरोपी सेल्फी घेत आहेत, हा फोटो शेअर करत त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत हे असे नवनवीन फोटो रोज ट्विट करत शेअर करत आहेत.

खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका व्यक्तीसोबत सेल्फी काढत आहेत. या फोटोवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. गृहमंत्री देवेंद्र जी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत!हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच! हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, असे संजय राऊतांनी ट्विट केले आहे.

राज्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यामध्ये भरदिवसा शरद मोहोळची हत्या करण्यात आली तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली. या सर्व घटना ताज्या असतानाच दहिसरमध्ये शिववसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीमाना द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या गुन्हेगारीच्या घटनांवर सगळीकडे वातावरण चांगलेच पेटले आहे.

हे ही वाचा: 

हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला भारतरत्न मिळायला हवा – Raj Thackeray

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा करणार आमरण उपोषण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss