Saturday, July 27, 2024

Latest Posts

मुंबईच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, असे करा प्रवासाचे नियोजन

मुंबईची लोकल ही सर्व मुंबईकरांची लाईफलाइन आहे.

मुंबईची लोकल ही सर्व मुंबईकरांची लाईफलाइन आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कारणासाठी मुंबईच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करण्याचे नियोजन करणार असाल तर मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) नक्की पाहा. मध्य रेल्वेच्या माटुंगा – ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी४.०५वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी१०.१४ ते दुपारी ३.०९ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान या लोकल थांबणार आहेत. ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटं उशिरा पोहचणार आहे. कल्याण वरून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर रेल्वे सेवा वळवण्यात येणार आहे. ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबणार आहेत. त्यानंतर पुढे वळवण्यात येणार आहेत. डाऊन धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.१८ वाजता सुटेल. अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी ९.५५ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ३.२४ वाजता सुटेल. सकाळी ११ ते ०५ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहचणार आहेत.

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेलहून सकाळी ११ ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहणार आहे . डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ३.१६वाजता असेल आणि पनवेल येथे सायंकाळी ४.३६ वाजता पोहोचेल.

हे ही वाचा: 

चाळीसगावाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा करणार आमरण उपोषण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss