Saturday, July 27, 2024

Latest Posts

आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा सोशल मीडियावर रिल्स पोस्ट, अजित पवारांनी दिला गुन्हेगारांना इशारा

पुण्यात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे.

पुण्यात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील गुंडानी संपूर्ण शहरात दहशत माजवली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून कधी दिवसांआधी गुंडांची परेड काढण्यात आली होती. गुन्हेगारांची काढलेली ही परेड सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्व गुंडाना पोलिसांकडून दम दिल्यानंतर सुद्धा गुंडांकडून सोशल मीडियावर रिल्स वायरल होत आहेत. दम देऊनसुद्धा अनेकजण पोलिसांचे आदेश मानत नसल्याचे दिसून आले आहे. जर गुंडाना दम देऊन सोशल मीडियावर रिल्स शेअर करणं थांबत नसेल आणि परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल, अश्या शब्दात पमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट गुन्हेगारांना इशारा दिला आहे.

पुण्यामध्ये नवनियुक्त आयुक्तांनी दोन दिवस पुण्यामधील ५०० गुंडाना एकत्र करून त्यांची परेड काढली होती. त्यांना पोलीस आयुक्तांकडून दम देखील देण्यात आला होता. कोणताही गुन्हा करायचा नाही, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा द्यायचा नाही, सहभागी व्हायच नाही, गुन्हेगारीच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ करायचे नाहीत, रिल्स बनवायचे नाहीत, स्टेटस ठेवायच नाही अश्या सर्व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा सोशल मीडियावर गुंडांकडून अनेक रिल्स वायरल केले जाते आहेत.जर हे सर्व प्रकार असेच चालू राहिले तर सगळ्या गुन्हेगारांना खाक्या दाखवायला हव्या. पुण्यातील हे सर्व गुन्हे थांबवण्यासाठी आयुक्तांची भेट घेऊन नेमकी कारवाई कोणती करायची किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, या सगळ्यावर उपमुख्यामंत्री अजित पवार आयुक्तांसोबत चर्चा करणार आहेत.

पुणे सारख्या मोठ्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा गोळ्या झाडणे, हत्या यांसारखे अनेक प्रकार पुण्यात घडत आहेत. गुन्हेगारांना पोलीस दम देऊनसुद्धा हे सर्व कमी झालेले नाहीत. त्यामुळे पुणे पोलीस या गुंडांवर कठोर कारवाई करणार आहेत. कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले हे पुण्यातील कुख्यात गुंड आहेत.

हे ही वाचा: 

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा;खासदार संजय राऊतांची मागणी

मैत्रीचा प्लॅन करत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss