Friday, April 19, 2024

Latest Posts

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा;खासदार संजय राऊतांची मागणी

मागील काही दिवसांपासून राज्यभरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. काळ पुन्हा एकदा झालेल्या गोळीबारानंतर राज्यात कायदा आणि सुव्यस्था आहे कि नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे दोघं एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. त्यावेळीस मॉरिस याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. घडलेल्या या घटनेनंतर राज्यात सगळीकडे खळबळ माजली आहे. यावरसंजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये माफिया राज पाहायला मिळत आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचं आहे. राज्यात हत्या, दरोडा सारख्या घटना घडत आहे. राज्याचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दीड वर्षात फक्त गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहे. आमदार गुंडगिरी करून जमिनी ताब्यात घेत आहे. न्यायालयाच्या परिसरातून वकिलांचे अपहरण केले जात आहे. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत,ते अदृश्य आहेत . चाय पे चर्चा करणारे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कधी चर्चा करणार आहेत. गुंडांसोबत चाय पे चर्चा होत आहे. शिंदे गटाचे लोक गुंडांसोबत रोज चाय पे चर्चा करत आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत अपयशी गृहमंत्री आहेत. आमच्यावर टीका करण्यासाठीच फक्त फडणवीस यांना गृहमंत्री पद दिला आहे. महाराष्ट्राची जनता तुमचा राजीनामा मागत आहे. राज्यातील गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान,यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, गुंडांनी गुंडांसाठी चालविले राज्य म्हणजे म्हाराष्ट्र राज्य अशी परिस्थिती काही दिवसांपासून झाली आहे. मंत्रालय, नागपूरच्या विधान भवनात अनेक गुंड हे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या चिरंजीवांना भेटत आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे बॅनर कोण लावत आहे. अनेक कंत्राट हे गुंडांना दिले जात आहे. असेच एक रुग्णवाहिकेचे ८ हजार कोटींचे काम देण्यात आले. अनेक माफिया या टेंडरमध्ये लाभार्थी आहेत. सरकारचे पैसे हे गुंडांसाठी वापरले जात आहे. कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यात शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाच नाव आले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली पाहिजे होती. गणपत गायकवाड यांनी थेट सांगितले आहे की, माझे कोटीच्या कोटी रुपये शिंदेकडे पडून राहिले आहे. तरी देखील कारवाई होत नाही , असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचा सूढ घेण्याचे ठरवले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. पण त्यांच्याकडून आतापर्यंत कारवाई करू असे म्हटले गेले नाही. मुंबईत एका लोकप्रतिनिधीची दिवसाढवळ्या हत्या होते आणि तुम्ही वाढदिवस कसले साजरे करतात असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला. त्यामुळे, मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की, दीड वर्ष भोगले आता दूर व्हा, खोके जमले आणि खोके वाटले. आमच्या लोकांना दूर केले गेले. महाराष्ट्राची वाट लावली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा: 

मैत्रीचा प्लॅन करत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

मसाल्यांचा राजा म्हणून ‘या’ शहराची आहे ओळख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss