Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यातील १९ वर्षीय विद्यार्थी इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, एनआयए पोहचले घरी

महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात इसिस मॉड्यूलच्या कारवाया सुरु आहेत.

महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात इसिस मॉड्यूलच्या कारवाया सुरु आहेत. पुणे पोलिसांनी सर्वप्रथम हा प्रकार उघडलं केला. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना १८ जुलै २०१८ रोजी पकडले होते. त्यावेळी त्याचा तिसरा साथीदार शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा हा फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरुवातील महाराष्ट्र दहशतवादी पथकाने केला होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर या शहरापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल अमरावती जिल्ह्यात आले. आता पुणे शहरात इसिस मॉड्यूलच्या संपर्कात आलेल्या एका विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील १९ वर्षीय तरुणाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहे. बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. संबधित तरुणाची कसून चौकशी एनआयएचे पथक करत आहे. विद्यार्थ्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री NIA ने केलेल्या छापेमारीत एका विद्यार्थ्यांला ताब्यात घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यास अमरावतीला आणले गेले आहे. अमरावतीमध्ये एका ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात त्याची कसून चौकशी NIA कडून सुरु आहे. NIA ने ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असण्याचा संशय NIA ला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीच अचलपूर, परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई एनआयएने केली आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईत सुरु असलेले इसिस मॉड्यूल आता विदर्भात आल्याचे यामुळे समोर आले आहे.

हे ही वाचा:

पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन…

सलग चौथ्या दिवशीच्या चौकशीवर काय म्हणाले ठाकरे गटाचे बडगुजर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss