Wednesday, February 28, 2024

Latest Posts

सलग चौथ्या दिवशीच्या चौकशीवर काय म्हणाले ठाकरे गटाचे बडगुजर?

माझी कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर शिवसौनिकांसमोर आणि एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईन, असा इशारा नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे.

माझी कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर शिवसौनिकांसमोर आणि एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईन, असा इशारा नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे. एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते १०६ पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने मी आठ दिवसांची मुदत मागितली आहे, असं बडगुजर आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.

सलग चौथ्या दिवशी सुधाकर बडगुजर चौकशी करण्यात येणार आहे. बडगुजर यांच्या अन्य दोन भागिदारांचीही एसीबी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या झाडाझडतीत काही महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बडगुजर म्हणाले की, ACB ने अचानक रात्री ७ वाजता नोटीस दिली आहे. . ७.३० वाजता माझ्या दोन्ही बंगल्यावर छापा टाकला. त्यापूर्वी ACB ने गुन्हा दाखल केला. माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाची फसवणूक केली नाही. हे माझ्या जिव्हारी लागलं आहे. मला निवडणूक लढवायची होती, २००६ला मी कंपनीतून राजीनामा दिला. रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर देखील झाले. कोर्ट पीटिशन झालं, २०११ ला कोर्ट ऑर्डर देखील झाली. ACB ला कोर्ट ऑर्डर माहीत नव्हती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलं जात आहे.

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या; पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुढे ते म्हणाले की, निवृत्ती आणि सेवा निवृत्ती कधी झाली हे या कोर्ट ऑर्डरमध्ये आहे. २०१३ मध्ये तक्रार दिली मग ACB ला १० वर्षे का लागले? अन्याय करण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असल्याचंही बडगुजर यांनी म्हटलं आहे. तर पोलिसांनी थोडा संयम ठेवायला हवा, असंही ते म्हणालेत.

म्यूनसिपल सेनेच्या कार्यालायच्या ताब्यावेळी देखील असच झालं. आम्हाला पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. पण शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जातात. जर माझ्याकडे असलेले कागदपत्र बनावट असतील तर मी या शिवसैनिकांसमोर आणि ACB कार्यालयासमोर जाहीरपणे आत्महत्या करेन असंही बडगुजर म्हणाले. तर हा त्रास देण्याचा प्रकार आहे. अन्यायकारक कारवाई करू नका, सत्ता येते, सत्ता जाते सत्त्तेचा उन्माद फार काळ टिकत नाही असंही बडगुजर पुढे म्हणालेत .

 

हे ही वाचा:

देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss