Tuesday, May 7, 2024

Latest Posts

‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीन शूट करताना सेटवर फक्त ५ जण, तृप्ती डिमरीनी दिली प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा २०२३ या वर्षाचा शेवट खुप धमाकेदार आहे.कारण बहुचर्चित असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा २०२३ या वर्षाचा शेवट खुप धमाकेदार आहे.कारण बहुचर्चित असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाला अवघ्या सहा दिवसांत ५०० कोटींचा गल्ला जमावण्यात यश मिळालं आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील हिंसा व बोल्ड सीन्समुळे अनेकांनी टीका केली. तर, याउलट काही जणांकडून रणबीर, बॉबी देओल, मराठी अभिनेते उपेंद्र लिमये, रश्मिका यांचं कौतुक करण्यात येत आहे.दरम्यान या कलाकारांसोबत असलेली आणखी एक अभिनेत्री चित्रपटात भाव खाऊन गेली ती म्हणजे तृप्ती डिमरी.सध्या तिची नॅशनल क्रश म्हणुन ओळख निर्माण झाली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तृप्तीच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय इंटरनेटवर तिच्या आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

या सगळ्यावर अभिनेत्रीने नुकत्याच एका वृतवाहिनीला दिलेल्या  मुलाखतीत भाष्य केलं.तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झोया हे पात्र साकारलं आहे. तिच्या अभिनयाचं चित्रपट समीक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. यापूर्वी तिने ‘बुलबूल’, ‘काला’ अशा रहस्यमय चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतु,तिची खरी ओळख आणि प्रसिद्धि  ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे झाली.‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आणि यामधील इंटिमेट सीन याविषयी सांगताना तृप्ती म्हणाली, “संदीप सरांनी चित्रपट साइन करायच्या आधी त्या इंटिमेट सीनबद्दल आणि चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल मला संपूर्ण माहिती दिली होती. तो सीन कशाप्रकारे शूट केला जाईल हे सुद्धा सांगितलं होतं. तसेच अंतिम निर्णय तुझा असेल…तुला या सीनबद्दल काहीच अडचण नसेल आणि शूट करणं सोयीचं असेल, तरच आपण पुढचा विचार करू असं त्याने कळवलं होतं.”

तृप्ती डिमरी पुढे म्हणाली, “चित्रपटातील त्या दोन पात्रांसाठी तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग होता. त्यामुळे झोयाची भूमिका साकारताना मला काही अडचण, तर नाही ना? याची पूर्ण काळजी सेटवर घेण्यात आली. असे सीन्स शूट करताना आपण सेटवर पूर्णपणे प्रामाणिक राहणं आवश्यक असतं. आपल्याला काय सोयीचं आहे काय नाही…या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. अर्थात आमच्या सेटवर सगळ्यांनीच मला खूप जास्त समजून घेतलं.”“आम्ही सीन शूट करत असताना संदीप सरांनी वेळोवेळी मी व्यवस्थित आहे की नाही, मला काही अडचण नसावी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. याशिवाय रणबीर देखील दर ५ मिनिटांनी माझी चौकशी करत होता. मी अस्वस्थ होणार नाही याची काळजी त्याने घेतली. माझ्या सुदैवाने ‘बुलबूल’मधील बलात्कारचा सीन असो किंवा ‘अ‍ॅनिमल’ असो या दोन्ही चित्रपटांच्या सेटवर मला फार चांगली लोकं भेटली. या सीनदरम्यान सेटवर फक्त ५ जण उपस्थित होते. त्यापेक्षा जास्त जण उपस्थित नसतील याची वेळोवेळी सर्वांनी काळजी घेतली. त्यावेळी सेटवर फक्त दिग्दर्शक, डीओपी आणि कलाकारांशिवाय इतर कोणीही नव्हतं. सेटवर यायची कोणालाही परवानगी नव्हती, सगळे मॉनिटर्स बंद होते. याशिवाय शूट करताना तुला कधीही अस्वस्थ वाटलं, तर लगेच आम्हाला सांग आपण तुझ्या सोयीनुसार जाऊ असंही मला सांगितलं होतं. हे संवेदनशील सीन्स अशाप्रकारे शूट केले जातात याची कल्पना कोणालाही नसते” असं तृप्तीने सांगितलं.

चित्रपटातील भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय याबद्दल तृप्ती म्हणाली, “जेव्हा संदीप सरांशी मी याबद्दल चर्चा केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की, हे एक नकारात्मक पात्र आहे. पण, तुझी नकारात्मक बाजू पटकन लोकांना दिसणार नाही अशा पद्धतीने तुला ते साकारायचं आहे. तुझ्यातील निरागसता सर्वात आधी लोकांना दिसली पाहिजे. कोणतीही भूमिका करताना आपण १०० टक्के प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण, व्यक्तिरेखेला न्याय देणं खूप अवघड गोष्ट आहे. आज झोयाच्या भूमिकेचं होणारं कौतुक पाहून मी प्रचंड आनंदी आहे.”दरम्यान ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील तृप्तीच्या छोटी भूमिकेन तिला खुप मोठी ओळख निर्माण करुन दिली आहे असं म्हणायला हरकत नाही.

हे ही वाचा:

कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू

देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss