Friday, May 17, 2024

Latest Posts

पुण्यात अजित पवारांची जागा घेतली रोहित पवारांनी…,वादा तोच, पण दादा नवा!

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवार यांना या निवडणूक नवीन चिन्ह आणि नवीन नावावर लढाव्या लागणार आहेत. आत सगळ्यांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. तर आज पुण्यात एक नवीनच चित्र बघायला मिळाले आहे. पुण्यातील (Pune) आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात शरद पवार गटाचे रोहित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. तर या बॅनरवर आता अजित पवार यांची जागा रोहित पवार यांनी घेतली आहे.

“वादा तोच, पण दादा नवा” या आशयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील अजित दादांची (Ajit Pawar) जागा रोहित पवारांनी घेतली, असं दर्शवणारा हा फ्लेक्स पुणे-नाशिक महामार्गावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रोहित पवारांच्या (Rohit Pawar Banner) फोटोसह “वादा तोच, पण दादा नवा”हे फ्लेक्स झळकले आहेत. त्याच भागात आज शरद पवारांची जाहीर (Sharad Pawar Sabha in Pune) सभा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि स्वतः रोहित पवार (Rohit Pawar Flex) सुद्धा या सभेला उपस्थित असतील. आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करण्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरु आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Party) आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) समर्थक मयूर भालेरावांनी (Mayur Bhalerao) हा फ्लेक्स झळकवला आहे. यामुळं बरीच चर्चा मात्र रंगलेली आहे.

मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र, आज त्याच वळसे पाटलांविरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. आज थेट वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशारितीने वळसेंना पराभूत करण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळाल्यावर पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पवार आंबेगाव विधानसभेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शरद पवार त्यांच्या मानसपुत्राचा कोणत्या शब्दात समाचार घेतात, याकडे केवळ मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असेल.

हे ही वाचा:

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss