राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pwar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून बोलत असताना रोहित पवार म्हणाले, “अजित पवार सत्तेत राहू शकत नाहीत. २०१९ पासूनच त्यांचा भाजपात जाण्याचा प्लॅन होता.” रोहित पवार यांच्या विधानाने राजकीय वातावरणात चर्चा सुरु झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करतच असतात. पण आता, रोहित पवारांनी अजित पवारांबाबत हा गौप्य्स्फोट केल्याने अजित पवार आता काय प्रत्युत्तर देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इंदापूरमध्ये रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय २०१९ लाच घेतला होता. हे मी नाही त्यांचे नातेवाईकच सांगतात. ते २०२९ पासूनच साहेबांना सोडण्याचा प्लॅन करत होते. दादा सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. त्यांच्याबरोबर गेलेले नेतेही सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. पुणे जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित नियम होता, म्हणून आम्ही लक्ष देत नव्हतो.”
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात लढत होणार आहे. पण हि लढत शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार अशी रंगत असल्याचे दिसत आहे. अजित पवार या मतदारसंघात जोर लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ता, दुसरीकडे शारदा पवारही लेक सुप्रिया सुळे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हि लढत चुरशीची होणार यात शंकाच नाही.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले,”इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. तुम्ही कितीही बोला केंद्रात सुप्रियाताईच निवडून जाणार, सुनेत्रा काकी नाही. अजित पवारांनी साहेबांना सोडलं त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास नाही. साहेबांना सोडून तुम्ही भाजपसोबत गेलाय हे किती जणांना आवडलं? एका बाजूला तुम्ही म्हणाता वातावरण भावनिक करू नका आणि मग तुम्हीच ते करता,”
हे ही वाचा:
‘सहानुभूतीची भेट’, आरोपींना कठोर शिक्षा करू CM शिंदेंचे निर्देश