Tuesday, April 30, 2024

Latest Posts

‘सहानुभूतीची भेट’, आरोपींना कठोर शिक्षा करू CM शिंदेंचे निर्देश

रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी पहाटे काही अज्ञात आरोपींनी पहाटे ५ च्या सुमारास बाईक वरून येत सलमान खान च्या गॅलॅक्सि अपार्टमेंट वरती गोळीबार केला होता.त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची राहत्या घरी जाऊन भेट घेतली.

रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी पहाटे काही अज्ञात आरोपींनी पहाटे ५ च्या सुमारास बाईक वरून येत सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. त्यातली एक गोळी सलमान च्या गॅलरीमधून आत देखील गेली होती. यात कुणालाही दुखापत जरी झाली नसली तरी बिष्णोई गॅंगशी या घटनेचा संबध जोडला गेला होता आणि नंतर गॅंगने ते मान्यही केले होते. नंतर मुंबई पोलि‍सांनी सलमान खान व त्याच्या परिवारास कडक पहारा देखील दिला आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल देखील उपस्थित होते. भेट घेण्यापूर्वी हल्ला झाल्यानंतर शिंदेंनी सलमानची फोन करून चौकशी देखील केली होती. भेटीनंतर शिंदे म्हणाले, ‘मुंबई पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली आहे. या घटनेमागे नेमके कोण आहे याची खणून तपासणी चालू आहे. जे कोणी या कटात सामील असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. सध्या तरी सलमान व त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवर आहे. झालेल्या घटनेवर तपास चालू आहे.’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात मुंबई पोलि‍सांना मोठे यश आले. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी गुजरात मधील भुज येऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईला आणण्यात आले. २५ एप्रिल पर्यंत कोर्टाने आरोपींना कोठडी सुनावली आहे. हे आरोपी नवी मुंबई मधील पनवेलमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी १ महिन्यापासून पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. महिनाभर सलमानच्या घराची पाहणी केल्यानंतर १५ एप्रिल रोजी आरोपींनी त्याच्या घरावर गोळीबार केला. दोघेही आरोपी मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहेत. गोळीबार झाल्यानंतर काही तासातच अनमोल बिष्णोई याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे त्याच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून सांगितले होते. अनमोल बिष्णोई हा तुरुंगात असणाऱ्या लॉरेंस बिष्णोई याचा भाऊ आहे. ही बातमी मिळताच अनमोल विरोधात FIR दाखल करण्यात आलेली आहे. अनमोल सध्या परदेशात असतो.

हे ही वाचा:

AAMIR KHAN ही झाला डिपफेकचा शिकार, पोलिसांकडे घेतली धाव

आगामी T-२० चषकासाठी ‘या’ १५ खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss