Saturday, May 18, 2024

Latest Posts

कुठे चूक झाली,कशामुळे चूक झाली… ती शोधून काढा, शरद पवारांची आक्रमक भुमिका

अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाही असा टोला लगावतानाच जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी.

अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाही असा टोला लगावतानाच जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे…ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातावर आपले मत व्यक्त करतानाच काही उणीवा आणि सरकारने नेमके काय करायला हवे हे सांगितले. ५ लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाही याची जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजेत असेही शरद पवार यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव शरद पवार यांना सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाददुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक याचे नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत हे सांगतानाच गावात एखाददुसरा अपघात झाल्यावर एखादा व्यक्ती गेली तर लोक या अपघातात एक देवेंद्रवासी झाला असे बोलतात हा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला.

हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत – नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे असेही शरद पवार म्हणाले. माझं वैयक्तिक मत आहे.आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे असेही मत शरद पवार यांनी मांडले. एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड कॉंग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत असेही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

हे ही वाचा:

बुलढाण्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

नागपूरहून जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात

आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss