पुणे उमेदवारीसाठी आता Vasant More कोणाला भेटणार?

पुणे उमेदवारीसाठी आता Vasant More कोणाला भेटणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले वसंत मोरे (Vasant More) हे अनेक दिवसांपासून नेतेमंडळींची भेट घेताना दिसून येत आहेत. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत  (Sanjay Raut) यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचीसुद्धा भेट घेतली. त्यानंतर आता वसंत मोरे (Vasant More) हे २९ मार्च रोजी दुपारी राजगृह (Rajgruh) येथे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे (Vasant More) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर, भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीमध्ये पुणे (Pune) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँगेसचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देण्यात आली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. पण त्यात पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्याच अनुषंगाने, आता वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे हे दिसून आले होते. त्यामुळे ते मराठा समाजाचे उमदेवार असण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, वंशात मोरे यांना माध्यमांशी बोलण्यासाठी मराठा समाजाच्या काहीजणांनी हटकले आणि ही वागणूक पाहून वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीतून निघून गेले होते. या प्रकारानंतर ते कोणती भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष होते. आता ‘राजगृह’ येथे वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींबाबत चर्चा केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा:

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version