Friday, April 19, 2024

Latest Posts

७ फेब्रुवारीपासून राज्यातील निवासी डॉक्टर डॉक्टरांनी दिला संपावर जाण्याचा इशारा

आताच्या घडीची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राज्यातील (Maharashtra News) निवासी डॉक्टर (Doctors) यांच्या संदर्भात ही बातमी आहे.

State Doctors Strike : आताच्या घडीची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राज्यातील (Maharashtra News) निवासी डॉक्टर (Doctors) यांच्या संदर्भात ही बातमी आहे. राज्यातील (Maharashtra News) निवासी डॉक्टर (Doctors) दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ पासून संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टर यांच्या अनेक मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी राज्य सरकारची सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

  • डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था
  • ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे
  • नियमित मानधनाचा अभाव (याशिवाय इतर अनेक समस्या)

डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे (Maharashtra Association of Resident Doctors) अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले आहे. तसेच, डॉक्टरांच्या सर्व मागण्यांबाबतच पत्रकही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss