Tuesday, April 30, 2024

Latest Posts

SANJAY RAUT यांनी FOUNDATION ची पूर्ण माहिती घ्यायला हवी- UDAY SAMANT

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाशिम येथे माध्यमांशी संवाद साधला. वाशिम येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत भाष्य केले.मला संजय राऊत यांना विनंती करायची आहे की, अजून एक पत्र त्यांनी नरेंद्र मोदी यांना लिहलं पाहिजे. ते म्हणजे १०० कोटी रुपयांची वसूली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये कोणी घेतलं? १०० कोटी रुपयांच्या वसुलीचाच फक्त त्यांच्याकडे कार्यक्रम दिला नाही तर या जगात ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या देशाचे नाव उद्योगपती म्हणून मोठं केलं. त्या अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवायला सांगितले, यासाठी देखील चौकशीचे पत्र दिले पाहिजे. कोविडमधील भ्रष्टाचार देखील उघड केला पाहिजे, हे पण पत्र दिले पाहिजे. खिचडी घोटाळा कोणी केला? त्यामध्ये कोण कोण होत? याच्या देखील चौकशीचे पत्र नरेंद्र मोदींना दिले पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले. 

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर जे आरोप केले गेले आहेत, त्या फाउंडेशनची संजय राऊत यांनी माहिती घेतली पाहिजे. जवळ-जवळ २५ हजार रुग्णांना त्यांनी मदत केली आहे. लहान मुलांना त्यांनी मदत केलेली आहे. जर श्रीकांत शिंदे फाउंडेशन एवढ चांगल काम करत असेल, तर फक्त त्यांचं आडनाव शिंदे आहे आणि ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत म्हणून हे सुरु असेल तर, त्यांनी मी सांगितलेल्या सगळ्या प्रकरणाची पत्रे नरेंद्र मोदी यांना लिहली पाहिजेत, असे उदय सामंत यांनी सांगितले.  मी ठामपणे सांगतो, मी उद्योग मंत्री आहे. मला मुख्यमंत्री सोडा, मुख्यमंत्री कार्यालय सोडा, एवढ्या वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्योग विभागातील एखाद्या प्लॉटचे काम करा, असा एखादा फोन सुद्धा डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आला नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री यांचे चिरंजीव असले तरी दुसऱ्या खात्यामध्ये किंवा विभागात हस्तक्षेप करत नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रत्येकाने सक्रियपणे काम करावं हा निर्णय भावना गवळी यांनी आधीच घेतला होता. परंतु, त्यांचं नियोजन कसं असावं, पूर्ण मतदारसंघात कशा पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि त्या मेळाव्याची सुरुवात १८ तारखेला येथून होणार आहे, त्या मेळाव्याचे देखील नियोजन आम्ही केले आहे. भावना गवळी यांच्या नेतृत्वात आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. भावना गवळी यांनी पहिली घेतलेली पत्रकार परिषद आणि आता आम्ही घेतलेली पत्रकार परिषद या दोन्ही पत्रकार परिषद आम्ही संमतीने घेतलेल्या आहेत, यात कोणतीही वेगळी चर्चा झालेली नाही. फार मोठ्या मताधिक्याने राजश्री पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प हा भावना गवळी यांनी केलेला आहे. 

हे ही वाचा:

Narendra Modi यांच्या सर्व गॅरंटी खोट्या, खोटं बोल पण रेटून बोल हीच BJP ची पद्धत – Mallikarjun Kharge

Shrikant Shinde Foundation मध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार, Sanjay Raut यांचे PM Modi यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss