Thursday, February 29, 2024

Latest Posts

तब्बल ८६४ किलोमीटरचा प्रवास करत शिवसैनिकांची निष्ठा यात्रा पोहचणार मातोश्रीवर

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर ठाकरे गटाच्या पक्षात तर रोज नवनवीन घडामोड हि बघायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे समर्थन करणारे आमदार खासदार यांची संख्या कमी झाली आहे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर ठाकरे गटाच्या पक्षात तर रोज नवनवीन घडामोड हि बघायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे समर्थन करणारे आमदार खासदार यांची संख्या कमी झाली आहे परंतु दुसरीकडे ठाकरे गटावर शिवसैनिकांचे असलेले प्रेम मात्र कमी झाले नाही. याचेच एक उदाहरण नुकतंच समोर आले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून शिवसैनिकांची (Shivsena) निष्ठा यात्रा (Shiv Sena Nishtha Yatra) काढण्यात येणार आहे.

शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी वर्धा या जिल्ह्यातून शिवसैनिकांची (Shivsena) निष्ठा यात्रा (Shiv Sena Nishtha Yatra) निघणार आहे. वर्धा ते मुंबई असा तब्बल ८६४ किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. तर हे संपूर्ण अंतर सायकल ने कापत एकूण ९ दिवसात ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे. तर वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही यात्रा निघणार आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात ही होणार आहे. तर देशात आणि राज्यात वाढती बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या इत्यादींवर या जनजागृती यात्रेमधून करण्यात येणार आहे.

दीड वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप हा झाला. राज्यात शिवसेना या पक्षाचे दोन गट पडले. या वादामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची स्थापना झाली तर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट तयार झाला. या विभागणीमुळे आमदार खासदार यांच्या सह शिवसैनिकांची देखील फाटाफुट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अखेर आता या प्रकणात नुकतीचे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली. आता प्रतीक्षा असणार आहे ती विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची.

हे ही वाचा:

गुगलला आणखीन एक मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला ७० कोटी रुपयांचा दंड

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss